कार्याचा आढावा

मी आपल्यातीलच एक युवक असून, गेल्या 20-25 वर्षांपासून स्वाभिमान मित्र मंडळाच्या तर्फे सदैव समाजहिताचे कार्य करण्याचा मी सातत्याने प्रयत्न करत आलो आहे. जनतेच्या प्रश्नांना आवाज देणे, समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी उपक्रम राबवणे आणि सामान्य माणसाचा स्वाभिमान जपणे हेच माझ्या कार्याचे खरे ध्येय आहे. या प्रवासात आपल्या विश्वासानेच मला सतत बळ मिळाले आहे आणि त्या विश्वासाला जागण्यासाठी मी नेहमीच कटिबद्ध राहिलो आहे.

स्वाभिमान मित्र मंडळाच्या तर्फे सदैव समाजासाठी जगण्याचा आणि समाजहिताचे उपक्रम राबवण्याचा प्रयत्न केला आहे. माझ्यासाठी समाजकारण ही केवळ जबाबदारी नसून, ती माझ्या आयुष्याचा श्वास आहे. गरीब-श्रीमंत, लहान-मोठा असा भेद न करता प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू फुलवणे, गरजूंच्या डोळ्यातील अश्रू पुसणे आणि सामान्य माणसाचा स्वाभिमान जपणे — हेच माझ्या कार्याचे खरे समाधान आहे.

समाजातील युवकांना दिशा देणे, महिलांना आधार देणे, वृद्धांना साथ देणे आणि मुलांना भविष्याची आशा देणे हे माझे खरे ध्येय आहे. मला विश्वास आहे की एकत्रितपणे आपण समाजाचे रूपांतर घडवू शकतो आणि पुढच्या पिढ्यांसाठी उज्ज्वल भविष्य निर्माण करू शकतो.मी समाजभिमुख व समाजहिताचे विविध उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपण्याचा नेहमी प्रयत्न केला आहे. समाजातील प्रत्येक घटकाची समस्या समजून घेऊन, तिच्यावर योग्य तो उपाय शोधणे हे माझ्या कार्याचे मूळ ध्येय आहे.

शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, क्रीडा, महिला सक्षमीकरण, युवकांना रोजगाराच्या संधी आणि स्थानिक विकास या सर्व क्षेत्रांमध्ये मी सातत्याने कार्यरत आहे.

यामुळेच स्वाभिमान मित्र मंडळ आज सामान्य नागरिकांचा विश्वास संपादन करण्यात यशस्वी ठरले आहे.

“सामाजिक कार्य हे केवळ जबाबदारी नसून, ती एक आयुष्यभराची बांधिलकी आहे.”

याच ध्येयाने प्रेरित होऊन मी नेहमीच लोकांसाठी, लोकांसोबत उभा राहण्याचा संकल्प केला आहे.

गरीब रुग्णांच्या डोळ्यांतली असहाय्यता पाहिली तेव्हा ठरवलं –

“आरोग्य ही प्रत्येकाची मूलभूत गरज आहे, ती कोणत्याही परिस्थितीत नाकारली जाऊ नये.”

मी असंख्य मोफत आरोग्य शिबिरं घेतली, स्त्रियांच्या आरोग्यविषयक समस्या मांडल्या आणि बालकांच्या पोषणासाठी जनजागृती मोहिमा राबवल्या.आजही माझं ध्येय आहे की प्रत्येक नागरिकाला योग्य उपचार, योग्य सुविधा आणि आरोग्याचा हक्क मिळावा.

आरोग्य क्षेत्र

वंचित समाजातील एका मुलाच्या हातात पुस्तक दिसलं की माझ्या मनात प्रचंड आशा जागते. कारण ज्ञान हीच खरी ताकद आहे. माझ्या कार्यातून मी अनेक विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, शिष्यवृत्ती आणि करिअर मार्गदर्शन दिलं आहे. खेळ आणि संस्कृती ही जीवन समृद्ध करणारी साधनं आहेत – म्हणूनच मी युवकांना केवळ अभ्यासापुरतं मर्यादित न ठेवता त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी काम केलं आहे.

शिक्षण व युवक विकास

समाजातील प्रत्येक दुर्लक्षित व्यक्तीची वेदना माझ्या हृदयाला भिडते. अन्यायाविरुद्ध आवाज उठवणं आणि न्याय मिळवून देणं हीच माझी खरी जबाबदारी आहे. महिलांना स्वावलंबी करण्यासाठी रोजगार प्रशिक्षण, युवकांना सक्षम बनवण्यासाठी कौशल्य विकास आणि पर्यावरणासाठी वृक्षारोपण – हे माझ्या प्रवासातील अविभाज्य टप्पे आहेत. मी नेहमीच विश्वास ठेवतो की समाजाचा बदल हा रस्त्यावरच्या संघर्षातून आणि एकजुटीतूनच घडतो.

सामाजिक उपक्रम

समाजसेवेचे काम करताना मला नागरिकांच्या डोळ्यांत अपेक्षा दिसल्या

“कोणी तरी आमचं ऐकावं, आमच्यासाठी उभं राहावं.”

झोपडपट्टी पुनर्वसन, पायाभूत सुविधा, पाणी, वीज, रस्ते – हे फक्त विकासाचे मुद्दे नाहीत, तर हजारो कुटुंबांचं स्वप्न आहे. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी झटतोय आणि झटत राहीन. लोकशाही ही फक्त निवडणुकीपुरती मर्यादित नाही, तर लोकांशी सतत संवाद साधून त्यांचे प्रश्न सोडवणं हाच तिचा खरा आत्मा आहे. तो आत्मा जिवंत ठेवण्यासाठी माझं जीवन झटत राहील.

राजकीय कार्य

“विकास म्हणजे केवळ रस्ते वा इमारती नव्हेत; विकास म्हणजे सामान्य माणसाच्या आयुष्यातला सकारात्मक बदल.”